हरवलेलं पुस्तक
रविवार सुट्टीचा दिवस होता. बाबा नेहमी
प्रमाणे पेपर वाचत बसले होते. त्यांची नेहमीचीच सवय चहाचा एक-एक घोट घेत पेपर मधील बातम्यांचा
आढावा घेणं. बाबा पेपर वाचुन झालं की बुक शेल्फ मधलं एक तरी पुस्तक नेहमी
वाचायचे.पेपर वाचुन झाल्यावर बाबा नेहमी प्रमाणे बुकशेल्फकडे वळले.त्यांच ते
सध्याचं वाचनात आलेलं पुस्तक काही केल्या नजरेस पडत नव्हतं.बाबांची चिडचिड सुरु
झाली.आम्ही आपले रविवार म्हणुन उगीचचं अंथरुणात लोळत पडलो होतो.बाबांचं नेहमीच असं
व्हायचं एखादं पुस्तक मिळालं नाही की जिव कासाविस व्हायचा. शेवटी बाबांनी आम्हाला
साखरझोपेतुन उठवलचं आणि त्यांचं ते पुस्तक शोधायला लावलं.
मी बाबांना
विचारलं कुठलं पुस्तक सापडत नाहीए बरं? त्यावर बाबा म्हणाले मोहन साटमां चं "मोहनमाळ". अहो बाबा ते पुस्तक
तुम्ही या आधी वाचलयं राहुद्या ना आता सापडेल,असेल इथेच कुठेतरी. आमच्या बाबांना एक पुस्तक दोनदा वाचण्याची सवय. मी आणि आई
ने बाबां ना समजवण्याचा प्रयत्न केला,पण ते ऐकताएत कुठे?
(आम्ही लागलो
पुस्तक शोधायला) घरातली सगळी कपाटं,बेडच्या गाद्यां खाली सगळी कडे शोधुन झालं पण पुस्तक काही सापडेना.पुस्तक
हरवलयं लक्षात येताच बाबांची चिडचिड अजुनच वाढली.
बाबांचा आवाज ऐकुन शेजारचे सावंत
काका आले,
'काय ओ परब सकाळी
सकाळी कसला हा गोंधळ'?
त्यावर मी
म्हणाले बाबांचं पुस्तक हरवलयं सापडत नाहीए म्हणुन हा गोंधळ. सावंत काकांनी
विचारलं. 'कुठलं बरं'? मोहन साटम यांच "मोहनमाळ" मी म्हणाले. अहो परब ते माझ्या
कडे आहे. तुम्ही परवा सोसायटीच्या मिटींग ला आला होतात तेव्हा तिथेच विसरलात,मला दिसले मी घरी घेउन आलो.घरी घेउन आलो तर
म्हंटलं वाचुन बघु. वाचायला सुरवात केली तर त्यात रमलो. मी पण विसरलोच परत करायला.
थांबा आमच्या सौ ना सांगतो आणायला.
अहो सावंत राहुद्या तुमच्या कडे तुमचं वाचुन झालं की द्या.
असा हा सगळा गोंधळ. फक्त माणसं दुरावल्यावर नाही तर जवळचे पुस्तक हरवल्यावर ही
मन अस्वस्थ होतेच.
#book #favoritebook #interesting #happyplace #positive #thoughts


Chaaan lihlys ...माझंही असंच होतं,पुस्तक सापडेनासं झाल्यावर
ReplyDeleteLast line 👌👌
ReplyDelete