#nustasocial
त्या दिवशी Project Submit
करून पार्ला स्टेशन वरून Borivali Slow पकडली. बऱ्यापैकी Train मध्ये गर्दी कमी होती. तिथल्या एका Seat वर बसले. आधी इथे तिथे पाहिलं पण सगळेच आपापल्या
Mobile मध्ये Busy असल्याने मी ही माझा
Mobile Bag मधून काढला. Insta वर Post बघत असताना का कोण जाणे अचानक स्वत:चं Insta
Profile पुन्हा चाळावसं वाटलं. एक एक Photo बघत असताना मनात अनेक आठवणींनी गराडा घातला.
प्रत्येक Photo मागची काही ना काही Story होती, कुठलातरी Photo Collage चे Day's सुरु असताना काढला होता, तर त्यातली एक Photo Post तर माझ्या Birthday ची होती, तेव्हा माझ्या मित्र-मैत्रीणींना B'day
Party देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसताना
आम्ही सगळ्यांनी Contro
काढुन केलेली Party मात्र माझ्या कायम लक्षात राहिल. त्यानंतर College च्या Industrial Visit च्या Photo
ची Post
आली. ट्रेन मध्ये केलेली मज्जा,रात्री
प्रत्येकाकडुन ऐकलेल्या Horror
Stories,प्रवासात एकमेकांची आपलेपणाने केलेली
विचारपुस या सगळ्याची मज्जा दुसर्या कशातच नाही हे पुन्हा एकदा Photos बघताना जाणवलं. त्यानंतर एकेकाळी माझ्या आयुष्यातील Most Precious Phase असलेल्या Photos च्या Post ची रांग लागली BMM च्या Frist Year ला केलेली मज्जा मस्ती,ते प्रत्येक वेळी सगळ्यांच एकत्र असणं, या आधी कोणत्याच
शिक्षकांसोबत इतक्या Freely
कधीच वागणं-बोलणं झालं न्हवतं आमचं. Photos बघताना ते सगळं
पुन्हा जगायला मिळायलं तर किती भारी वाटेल असं वाटत होतं त्या क्षणी. जसे-जसे एकामागुन एक Photo
बघत होते तश्या तश्या त्या प्रत्येक Photo मागच्या आठवणी आणखीन स्पष्ट होत होत्या,
पण आठवणीच त्या तेवढ्या पुरता आठवायच्या आणि
सोडुन द्यायच्या. त्या विचारातुन मी भानावर आले. कारण हल्ली सगळेच आपापल्या कामात
इतके Busy झालेत आणि आता प्रत्येकाच्या Priorities सुद्धा बदलल्या आहेत.
कधीकाळी जिवापाड जपलेली नाती ही आता Social Media वरच जपली जातात. कधीतरी दुरच्या मावशीला hospitalize केलय हे
कळल्यावरच आपली पावलं तिथे वळतात. पण काय माहिती ही भेट शेवची भेट ठरेल. आपण ना
आपल्या जगण्याचं एक Clock
तयार केलयं. त्या घड्याळाच्या दोन
काट्यांमध्ये स्वत:ला बंधीस्त केलयं. कधीतरी त्या काट्यांना बाजुला सारुन त्यातुन
बाहेर पडुन आपण आपल्यासाठी जगुयात,आपल्या माणसांनसाठी वेळ काढुयात असं वाटतं.
हल्ली Ego हा तोर्यात असतो आणि नम्रपणा तो कुठे गुडुप झालाय काय माहिती? कदाचित तो
सुद्धा या धकाधकीच्या जीवनात आपल्यापासुन कुठेतरी दुर निघुन गेला असावा पण
आपल्याला आपली जवळची माणसं कायमची सोडुन जातात तसा तो कायमचा निघुन जाता कामा नये
इतकचं वाटतं. हल्ली माणसामाणसांमध्ये स्पर्धा लागलीए असं बोललं जातए पण मला वाटतं
ही स्पर्धा Like-comments-Followers यांच्यात लागलीए. हल्ली
इच्छा असुन समोरासमोर संवाद होत नाही. कारण What'sapp
च्या Emoji's
शिवाय आपण आपल्या Feelings Express करतोए असं वाटतचं नाही. मग तासभर त्याचा-तिचा Message आला नाहीतर Feeling Alone असं Status टाकणारे आपल्यातलेच काहीजण असतात. कधी-कधी
समोर एखादी ओळखीची व्यक्ती दिसली की आपण फक्त Hii-Hello मध्येच संवाद
कधी संपवतो हे आपल्यालाच आपलं कळत नाही.
शेवटी ती व्यक्ती कायमची आपल्यातुन निघुन
गेल्यावर तिच्या असण्याची खरी किंमत कळते पण तो पर्यंत वेळ निघुन गेलेली असते.
शेवटी हातात राहतात ते Photos,त्या आठवणी आणि हे hash tags #rip
#wemissu #love #feelingsad #memoris शेवटी या सगळ्यापलीकडे जाउन माणुस लागतोच Feelings share करायला.
- #social #love #hashtags #memoris #hello #feelings #share #things #awareness

सत्य परिस्थिति आहे.. खुप छान पद्धतीने लिहलयं ऋतु👌
ReplyDeleteThank You Shrutika 😇
Deleteसंवाद होतच नाहीय.social zale me ase sarvch mhantat..#mst rutu
ReplyDeleteहोना. खरंतर समोरासमोर बोलुन जितकं बरं वाटतं ना मनाला,तितकं Social Media वर जाणवत नाही.
DeleteKharach apan ata naati social media vrach japto😷 .khupch masta ahe purna blog 😍 me marathi vachayala kantala krte pn he vachat rahavasa vatla.❤❤
ReplyDeleteThank you so much!😊❤
Deleteआठवणी सोशल मीडियावर पोस्ट करतो म्हणजे ते एक प्रकारे जतन होत असते आणि त्या आठवणींचा ब्लॉग लिहून तू त्या आठवणी अजरामर केल्या आहेत
ReplyDeleteहो पण त्याच Social Media च्या अतिरिक्त वापरामुळे अनेक नाती दुरावतायेत हे सुद्धा अनुभवतेय मी.
DeleteNice
ReplyDeleteखरंच.
ReplyDeleteKhupach sundar lihlas Rutu..keep it up 😊👍🏼
ReplyDeleteThank you so much 😊😊
DeleteNice Topic 👌 keep it up 👍
ReplyDeleteखूप छान प्रकारे मंडलयस ऋतू👌👌
ReplyDeleteThank you Akshay 😊
Delete