Breakup के बाद...


Only Positive Vibes...
        
          असं म्हणतात की शाहण्या माणसाने कधीच प्रेमात पडु नये. आणि पडलात तर स्वत:ला वेळीच सावरता यायला हवं. पण प्रेम थोडीच ठरवुन होतं ते तर होउन जातं सहज आपल्या नकळत. असो इथे प्रेमाबद्दल बोलालयला गेलं तर खुप आहे बोलण्यासारखं तुर्तास आपण आपल्या मुळ मुद्दयाकडे येउयात. 
          
             एखाद्या व्यक्तीच्या पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर आपल्याला कशाचचं भान राहत नाही. त्या व्यक्तीला सोडलं तर दुसरं कशातच मन लागत नाही इतकी आपल्याला तिची सवय झालेली असते इतकं आपण तिच्यात गुंतलेलो असतो. या पलीकडे जाउन एखाद्या व्यक्तीची सोबत आपल्याला आवडते म्हणुन आपण तिच्या सोबत रहायला लागतो त्यावेळी आपण सातवे आसमान पे वैगरे पोहोचलेलो असतो. पण अधिक काळ त्या व्यक्ती सोबत घालवल्या नंतर काही कारणांमुळे जेव्हा Serious Breakup करण्याची वेळ येते  आणि तसं प्रत्यक्षात होतं तेव्हा मात्र प्रत्येकाला थोडा तरी त्रास होतोच इतकं प्रेमाने जपलेलं ते नातं संपवताना. अचानक मन अस्वस्थ होतं सगळचं संपुन गेल्यासारखं वाटत. आता आपलं पुढे काय ? कधी कधी मना विरुद्ध Breakup झालं म्हणुन समोरच्या व्यक्तीचा रागही येतो, त्याला किंवा तिला असं करताना काहीच वाटलं नसेल का? आपण आता एकटेच असे एक न अनेक प्रश्न सतवायला सुरुवात होते. पण खुप कमी जण असतात जे या Breakup च्या Phase मधुन Positively  बाहेर पडतात. Move On करतात. पण त्यांच काय होत असेल जे या Phase मधुन जाताना स्वत:ला त्रास करुन आपल्या आजुबाजुच्या व्यक्तींना सुद्धा यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सामील करुन घेत असतात. 

            
              मान्य आहे की त्या वेळी जुनं काहीच आठवायचं नाही स्वत:ला त्रास करुन घ्यायचा नाही असं आपण इतरांच्या सांगण्यावरुन ठरवतो पण प्रत्यक्षात तसं होत नाही,नेमकं नाही म्हटलं तरी एका Point ला सगळचं आठवतं आणि डोळे टचकन् पाण्याने भरुन येतात. एकत्र घालवलेले ते Precious Little Movements,तो पहिला स्पर्श,ती भांडणं आणि भांडुन पुन्हा गोडी होण्याची ती सवय हे सगळं आठवतं त्या वेळी. पण कधीकधी नात्यात काही वाईट गोष्टींचा अतिरेक व तोच तोच पणा यायला लागला की त्या नात्याची गाठ सैल होते. आणि शेवटी होतं ते Breakup.


                    पण  Breakup झाल्यावर आता सगळचं संपलं असं तरी कसं म्हणु शकतो आपण? कारण जेव्हा सगळचं संपलंय असं आपल्याला वाटतं ना खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची...!   कारण मध्ये बराचसा काळ गेल्यावर जेव्हा स्वत:साठी वेळ मिळतो ना तेव्हा आपण भरभरुन स्वत:वर प्रेम केलं पाहिजे म्हणजे नक्की काय तर स्वत:ला सतत Pamper करत रहायला हवं, तेव्हा आपल्याला जाणवतं की यार आपण इतरांवर प्रेम करता करता स्वत:ला वेळ देणचं विसरुन गेलो होतो. स्वत:ला काय हवय याचा आपण कधी विचारच नाही केला. मग एकांतात वेळ घालवला की एकांतात ही हळुहळु सुख सापडायला लागत.पण त्याचबरोबर मनात इतरांबद्दल प्रेम आणि आदर हा असायलाच हवा हे सुद्धा तितकचं खरं. आणि अगदीच कंटाळा आला,अस्वस्थ वाटलचं तर जवळचे मित्र-मैत्रीणीं आहेतच की त्यांच्या सोबत जितका वेळ घालवता येईल तितका घालवण्याचा प्रयत्न करायचा यामुळे खरोखरचं खुप Fresh झाल्यासारखं वाटतं.  


                 आपण स्वत:मध्ये आनंद शोधायला गेलो आणि तो आपल्याला मिळाला तर या सारखं दुसरं सुख नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खुप मोठा आनंद आपण घेउ शकतो. आपल्यालाच माहित असतं आपणं कोणत्या गोष्टी केल्या तर आपल्याला आनंद होईल मग त्या गोष्टी कराव्यात,मग त्यात पुस्तकं वाचणं अालं Songs ऐकणं अालं, अगदी मनात आलं तर गाणी लावुन मनसोक्त नाचावसं सुद्धा वाटलं तर तेही करावं. या सगळ्यामुळे नक्कीच आपल्याला Move On होण्यासाठी मदत होउ शकते. यामुळे दिवसेंदिवस आपल्याला Fresh वाटण्यात मदत होउ शकते. का आपण कोणासाठी आपल्या आयुष्यातला एक दिवस वाया घालवायचा? महत्वाचं स्व:वर प्रेम करण थांबवलं नाही पाहिजे तरचं या Breakup मधुन खर्या अर्थाने Negative To Possitve असा बदल घडु शकतो. 

-        #breakup #positive #negative  #vibes #happy #freshstart #moveon #hope #selflove #songs #music #movie  #movements 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरवलेलं पुस्तक

#nustasocial