मालिका,सिनेमा आणि तरुण पिढी

          
       आजकालच्या तरुणांवर मालिकांपेक्षा सिनेमांचाचा नकारात्मक असा परिणाम पहायला मिळतो. कॅालेजवयीन काही तरुण-तरुणी  तर सिनेमांमधील नट-नट्यांसारखे वागताना त्यांचे अनुकरण करताना दिसतात. सिनेमांमधील किंवा मालिकांमधील पात्रानुसार स्वत:ला Relate करताना दिसतात. तर काही वेळा हे तरुण-तरुणी  सिनेमातील किंवा मालिकांमधील पात्रांना आपल्या जिवनाचा भाग बनवतात. काही वेळा याचा अतिरेक ही होताना दिसतो. जर एखाद्या मालिकांमध्ये Sad Track सुरु असेल तर काही तरुण-तरुणींआपल्याच आयुष्यात खुप काहीतरी वाईट घडतेए असे React  करताना दिसतात. 

         
           मालिका आणि सिनेमे हे तरुण जीवनावर,मानसिकतेवर किती व कश्या पद्धतीने परिणाम करतात हे आपण रोजच्या जीवनात सतत अनुभवत असतो. मनोरंजनासाठी मालिका व सिनेमे बघणं वेगळं आणि मालिका-सिनेमांना आपल्या आयुष्याचा हिस्सा बनवणं वेगळं.
        
           सिनेमा व मालिका जगतात रमणारे काही तरुण वास्तवापासुन दुर होताना दिसतात. सिनेमांच्या काल्पनिक जगात रमतात व वास्तवाचे भान हरपुन जातात. सिनेमांमध्ये कित्येकदा Bold Scean दाखवले जातात, पण कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसुन ते पाहणे अशक्य होते त्यामुळे कित्येकदा काही तरुण घरी एकटे असताना किंवा मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत ते पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतात आणि काही तरुण प्रत्यक्षात तसे वर्तनही करताना दिसतात जे खुप भयानक आहे. तर काही वेळेला क्राईम मालिकां पाहुन सुद्धा नकारात्मक व वाईट गोष्टीकडे वळताना दिसतात. काही वेळा ह्या अश्या गोष्टीं बघुन मुलांकडुन सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात,हे ही तितकेच खरे.
     
        पण काही वेळेला सिनेमा आणि मालिकांमधुन खरचं खुप काही शिकण्या सारखे असते मनोरंजनाचे माध्यम म्हणुन जसा चित्रपट व मालिकांचा वाईट प्रकारे परिणाम होतो तसा चांगलाही होतो,पण हे आपल्यावर आहे कि आपण त्यातुन नेमकं काय घ्यायचं? आजपर्यंत कित्येक सिनेमा आणि मालिकांनी प्रेक्षकांसमोर वास्तविक जगात काय घडतयं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो सफलही झाला त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे "सैराट" सारखा चित्रपट. ह्या सिनेमाने अनेक प्रश्न तरुण तसेच इतर वयोगटातील प्रेक्षकांसमोर निर्माण केले आहेत.
     
        त्यामुळे प्रत्येक वेळेस मालिका आणि सिनेमांना दोष न देता त्याकडे आपण कुठल्या दृष्टीकोनातुन बघतो हे महत्वाचे असे मला वाटते.
#Serial #film #reality #youngsters #movie #negative #positive

Comments

Popular posts from this blog

हरवलेलं पुस्तक

Breakup के बाद...

#nustasocial