Villains
कोणताही चित्रपट Hit होण्यासाठी जसं चित्रपटाचं कथानक,नायक व नायिका महत्वाचे ठरतात तसेच त्यातील खलनायकही खुप महत्वाचा भाग असतात. आजवर बर्याच कलाकारंनी आपल्या अनोख्या Style मध्ये खलनायकाची भुमिका साकारत प्रेक्षकांची मनेे जिंकली आहेत. अगदी तो हिंदी मधला खलनायक असो किंवा मराठीतला. याचीच काही उत्तम उदाहरणं म्हणजे हिंदीतील Sholay मधील Gabbar Singh ची भुमिका साकारणारा Amjad Khan,Mr.India मधला Mogambo म्हणजेच अभिनेता Amrish Puri, Bobby मधील Prem(Prem Chopra),Mawali मधील Shakti Kapoor आणि Prem Rog मधील Raza Murad.
मराठी सिनेमा हा नेहमीच पुढारलेला राहिलाय. म्हणुनच आत्ता पर्यंत आपण मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे विषय हाताळताना पाहिले. Bollywood करांप्रमाणेच इथेही वेगवेगळे Villain साकारण्यात आले. मराठी Industry त सर्वात प्रथम Nilu Phule यांनी खलनायक कसा असावा याची नियमावलीच बनवली. Nilu Phule यांच्या "बाई वाड्यावर या" या One Line Dialogue ने सर्वांच्याच मनात त्यांची खलनायकी भुमिका कायमची ठसवली. तसेच Deepak Shirke, Milind Shinde, Sayaji Shinde,Anant Jog, Sadashiv Amrapurkar,Milind Gunaji आणि Uday Tikekar या सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय आणि भारदस्त आवाजामुळे वेळोवेळी आपल्या अभिनय शैलीतुन प्रेक्षकांची मनं जिंकली.
खलनायकांप्रमाणेच सिनेजगतात खलनायिकांनी ही प्रेक्षकांची मनं जिंकुन घेतली त्यातलचं उत्तम उदाहरण म्हणजे माहेरची साडी मधील खाष्ट सासुची भुमिका करणारी अभिनेत्री 'उषा नाडकर्णी'. उषा नाडकर्णींची माहेरची साडी मधील भुमिका आजही सर्वांच्या लक्षात राहिली ती त्यांच्या उत्तम अभिनयामुळे. अभिनेत्री Lalita Pawar यांनीही बर्याच चित्रपटात Villain ची भुमिका साकारली होती. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे Bollywood अभिनेत्री Sridevi सोबत काम केलेल्या 'चालबाज' या चित्रपटात Rahini Hattangadi यांची खलनायिकेची भुमिका...
आणि सध्याचा मराठीतील तरुण खलनायक म्हटलं की आठवतो तो "मेवणे-मेवणे मेवण्यांचे पाहुणे" हा Dialogue मारत DSP आणि श्रेयस समोर Entry घेणारा दुनियादारीतील साई म्हणजेच अभिनेता Jitendra Joshi ... जितु ने दुनियादारीमधील साकारलेल्या या Villain मुळे दुनियादारीतील मैत्री आणि प्रेम पुन्हा एकदा जिंकले...
तर हे असे आहेत आपल्या सिनेजगतातील Villains, ज्यांनी हिरो ला वाईटा वर मात करायला संधी दिली... म्हणुन सिनेमातील Hero's बरोबर हे खाष्ट खलनायक आणि खलनायिका सुद्धा आज आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे आहेत. अस म्हणायला हरकत नाही...
#villains #movie #marathi #Bollywood #fight #heros #actor #actresses #film









खुप छान. वेगळा विषय आणि उत्तम मांडणी
ReplyDeleteThank you Shrutika 😊
Deleteअप्रतिम..मांडणी आणि शब्दरचना..👌
ReplyDeleteThank you Pramod 😊
Deleteआगळा वेगळा विषय उत्तम हाताळलायस ऋतु😊
ReplyDeleteThank you so much Neha 😊
Delete